कोरोनावर मात केल्यानंतर बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा शुटींगसाठी सज्ज
कोविड 19 वर मात केल्यानंतर आता बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा कामावर रूजु होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान सोमवार म्हणजे 24 ऑगस्ट पासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय क्विझ शो ‘ कौन बनेगा करोडपती’ च्या 12 व्या सीझनला सुरूवात केली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी केबीसीच्या सेट्सवरील काही क्षण शेअर केले आहेत. दरम्यान ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या 12 व्या सीझनसाठी शूटिंग सुरू झाले आहे. यामध्ये बीग बींच्या फोटोत युनीट निळ्या रंगाच्या पीपीई सूट मध्ये दिसत आहे.
2000 साली टेलिव्हिजनवर केबीसीला सुरूवात झाली. मागील 20 वर्षात केबीसीचे 11 सीझन झाले आहेत. तर 12व्या सीझनसाठी आता शुटिंग सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान बी यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. बच्चन कुटुंबामध्ये 4 जण कोरोनाच्या विळख्यात होते. मुंबईच्या नानावटी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले. आता बॉम्बे हाय कोर्टाने देखील 60 वर्षाच्या पलिकडील कलाकारांना पुरेशी काळजी घेत कामावर परतण्याचा मार्ग खुला केला आहे.