breaking-newsपश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/1patil_20ruturaj.jpg)
कोल्हापूर – कोल्हापूरमधील काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री उशिरा त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे विधानसभा आमदार आहेत.
दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे. ‘माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती’, असे ट्वीट ऋतुराज पाटील यांनी केले.