Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रास्ता रोको आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/WhatsApp-Image-2020-08-19-at-6.41.18-PM-1.jpeg)
कळंबोली: नवी मुंबईत मनसेने MSEB चे कार्यालय फोडल्याची घटना ताजी असतानाच कळंबोलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे महामार्ग रोखून धरलेला आहे. तब्बल अर्धा तास केलेल्या आंदोलनामुळे 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वाढीव विज बिले पाठवली जात होती.
या वाढीव बिलाच्या निषेधार्थ मनसेने आक्रमक पावित्रा घेतलेला. मनसेने कळंबोली येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर जाणारी वाहतूक रोखत जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक पणे आंदोलन केल्याने पोलीस आणि प्रशासनाची तारांबळ उडालेली होती. त्याचबरोबर जवळ पास एक तास हा महामार्ग रोखून धरल्यानंतर पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे.