महापालिका स्थायी समितीची सभा तहकूब; विविध मान्यवरांना वाहली श्रध्दाजंली
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापाैर रंगनाथ फुगे यांच्यासह विविध मान्यवरांना श्रध्दाजंली अर्पण करुन आज (बुधवारी) स्थायी समिती सभा गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते.
महापालिकेच्या स्थायी समिती आज (बुधवारी) साप्ताहिक सभेत दिवंगत माजी महापौर रंगनाथ फुगे, जेष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज, क्रिकेटपट्टू चेतन चव्हाण, प्रसिद्ध शायर, गीतकार राहत इंदोरी, कॅप्टन दिपक साठे यांच्यासह दहशवाद्यांशी चकमकीत शहीद झालेले, कोरोनामुळे
मयत झालेल्या शहरातील नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच स्थायीची सभा गुरुवार दि. २० ऑगस्ट सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, स्थायी समिती सदस्य राजेंद्र लांडगे, भिताताई फुगे, आरती चाैंधे, सुलधणा शिलवंत-धर आदी जण उपस्थित होते.