राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांच्या पार
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
- मुंबईत ७५३, पुण्यात १,८२९ नवे रुग्ण
मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ८ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले. तर २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच ११ हजार ३९१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ४ हजार ३५८ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख २८ हजार ५१४ जण कोरोनामुक्त झाले असून २० हजार २६५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ५५ हजार २६८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी ७५३ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा १ लाख २९ हजार ४७९ वर पोहोचला असून दिवसभरात ८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ८० टक्के म्हणजेच १ लाख ४ हजार ३०१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १७ हजार ७०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबईतील एकूण कोरोनाबळींची संख्या ७ हजार १७० इतकी झाली आहे.
पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १ हजार ८२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये पुणे शहरातील ८३५ जणांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात ८२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरातील एकूण मृत्यूच्या आकड्याचा सोमवारी उच्चांक नोंदवला गेला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३ हजार १०४ वर पोहोचली आहे, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २७ हजार २६ इतकी झाली आहे.