Breaking-newsमहाराष्ट्र
खासदार नवनीत राणांची कोरोनावर यशस्वीपणे मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/navnit-rana.jpg)
अमरावती – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र असे असले तरीही पुढील 20 दिवस नवनीत राणा यांना क्वारंटाईन राहावं लागणार आहे. नवनीत राणा यांच्यासह पती आमदार रवी राणा यांना शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट 6 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासह कुटुंबातील एकूण 12 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये नवनीत राणा यांचे दोन लहान मुले आणि सासू-सासऱ्यांचाही समावेश आहे