breaking-newsTOP Newsपुणे

मुंबईला मागे टाकत ‘पुणे’ बनलं देशातील नवं ‘कोरोना हॉटस्पॉट’

पुणे – देशभरातून महाराष्ट्राभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातही मुंबईत कोरोनाने थैमान माजवले होते. मात्र, आता मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याची बाब समोर आली आहे. देशात सर्वाधिक रुग्णांची पुणे शहरात नोंद होत असल्याने हे शहर मुंबईला मागे टाकत देशातील नवं ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने दक्षिण अफ्रिकेलाही मागे टाकले असून या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५,९५,८६५ इतकी आहे. जागतीक आकडेवारीनुसार, दक्षिण अफ्रिकेचा पाचवा क्रमांक लागतो. याबाबत अमेरिका (५५,६६,६३२), ब्राझिल (३३,४०,१९७), भारत (२६,४७,३१६) आणि रशिया (९,२२,८५३) हे देश दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहेत. दरम्यान, मुंबई शहर हे अद्यापही करोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाणात आघाडीवर आहे. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी माहिती देताना सांगितलं की, “महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांत COVID-१९ चे ३०० पेक्षा कमी मृतांची संख्या झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या २०,०३७ एवढी झाली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत राज्यात ५,९५,८६५ इतके बाधित लोक आहेत. महाराष्ट्राचं बरं होण्याचं प्रमाण हे ६९.८२ टक्के आहे. तर मृत्यूप्रमाण हे ३.३६ इतके आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलेल्यांची संख्या ४,१७,१२४ इतकी आहे. ही संख्या अॅक्टिव्ह केसेस १,५८,३९५ पेक्षा जास्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button