शिराळा तालुक्यातील कुंभार व्यावसायिकांचे तहसीलदारांना साकडे! …तर नुकसान भरपाई द्या!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/FB_IMG_1597644604907.jpg)
शिराळा | प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यात सार्वजनिक गणेशउत्सव आणि घरगुती गणेश मूर्ती आणि विसर्जन नियमावली तयार केली आहे. त्याबाबत प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. मात्र, प्रशासनाच्या भूमिकेमुळे कुंभार व्यावसायिकांवर अन्याय होत आहे, अशी भावना शिराळा तालुका कुंभार समाजातून व्यक्त होत आहे.
याबाबत तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन दिले आहे त्यामध्ये म्हटले आहे की, प्रशासनाने दि ११/०७/२०२० या रोजी काढलेल्या परिपत्रक नुसार कुंभार समाज व गणेश मूर्ती व्यवसायिक यांच्या वरती अन्याय होत असलेचे निदर्शनास येत आहे. यानुसार कुंभार व्यावसायिक ना योग्य तो न्याय अथवा होणारी नुकसान भरपाई शासनाकडून मिळावे यासाठी निवेदन शिराळा तालुका कुंभार समाज वतीने देणायत आले आयावेळी , अमित कुंभार, वैभव कुंभार, जयवंत कुंभार, वसंत कुंभार, तानाजी कुंभार, सुभाष कुंभार, रवींद्र कुंभार , विजय कुंभार, रोहित कुंभार, आनंदा कुंभार, पांडुरंग कुंभार, श्रेयस कुंभार आदी तालुकातील कुंभार बांधव उपस्थित होते.