Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: माजी खासदार निलेश राणे कोरोना बाधित

मुंबई: माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्याने कोव्हिड-19 चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असं ट्विट निलेश राणेंनी केलेलं आहे. तसेच, गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनीही त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे.
“कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतलेले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असं ट्विट त्यांनी केलेलं आहे.





