मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/96961-monsoon-pixa.jpg)
मुंबईत रिमझीम बरसलेल्या पावसाने पुन्हा दणक्यात हजेरी लावली असून गेले काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहेआहे. IMD ने दिलेल्या अपडेट्सनुसार, पुढील 2 आठवडे पावसाचा जोर कायम राहणार असून ऑगस्ट अखेर पर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच या काळात कोकणात पाऊस चांगला सक्रिय राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/image.png)
हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच नंदुरबार, धुळे भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
IMD दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्टला सिंधुदुर्गमधील कोल्हापूर-गगनबावडा आणि मालवणमध्ये 4000 मिमी पावसाची नोंद झाली. या आकडेवारीवरून येथील भागात समाधानकारक पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे. तर पालघर जिल्ह्यात 13 ऑगस्ट सकाळपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली. यात वसईत 90.0mm, वाडा 87.0 mm,डहाणू 90.1 mm, पालघर 56.8 mm,जव्हार 122.0 mm पावसाची नोंद झाली.