कोरोनानं मात केलेल्या न्युझीलंडमध्ये पुन्हा एकदा 4 कोरोना रुग्ण आढळले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/527201-01-02-1585028993-scaled.jpg)
जगात कोरोनाच थैमान वाढत असताना न्युझीलंडने कोरोनावर मात केली होती. १०० दिवस एकही कोरोना पेशंट न सापडल्याने जगभरात न्युझीलंडची स्तुती होऊ लागली होती. मात्र, केवळ २ दिवसांनी पुन्हा न्युझीलंडवर कोरोनाचे संकट आले आहे. ऑकलंडमध्ये ४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी याबद्दलच माहिती दिली. काल त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलंडच्या एका घरातील ४ सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोनावर लगाण कशी झाली याबाबत माहिती मिळाली नाही. देशात १०२ दिवसांनंतर स्थानिक संक्रमन झाले आहे.
पंतप्रधान म्हणाल्या, न्युझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंडमध्ये तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. तसेच बार आणि अन्य अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. याद्वारे आम्ही त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत. ही माहिती गोळा करणे खूप कठीण आहे, हे माहिती असल्याचे त्या म्हणाल्या.
पीएम जेसिंडा यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडतील याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यासाठी आम्ही तयारी केली होती. ऑकलंडमध्ये प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. जे लोक तिथे राहतात आणि घरी जात आहेत त्यांना अडविले जाणार नाही. शुक्रवारपासून लॉकडाऊन वाढविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात समारंभांना १०० व्यक्तींना परवानगी दिली जाईल. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असणार आहे.