breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
#COVID-19 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची तयारी !
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याबाबत एमपीएससीचे सचिव प्रदिपकुमार यांनी संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहीत पवार यांनी मंगळवारी एमपीएससीचे सवि प्रदिपकुमार यांची भेट घेतली. यावेळी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती करण्यात आली. परीक्षा पुढे ढकलता येणार नसतील, तर परीक्षा केंद्रावर सुरक्षिततेची संपूर्ण दक्षता घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली. याबाबत एमपीएससी प्रशासन सहमत असल्याची माहिती आमदार रोहीत पवार यांनी दिली आहे.