Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: चिंताजनक! माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटर सपोर्टवर; कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर झाली सर्जरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/pranab-mukherjee.jpg)
नवी दिल्ली: देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची ब्रेन सर्जरी यशस्वी झालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांना आर्मी रिसर्च आणि रेफरल रुग्णालयात भर्ती करण्यात आलेलं आहे.
यापूर्वी प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आलेले होते. त्यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिलेली होती. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याच आवाहन केलेलं होतं.