breaking-newsमहाराष्ट्र
दाभोळजवळ मच्छीमार बोटीला जलसमाधी
गुहागर – दाभोळजवळच्या अंजनवेल लाईट हाऊससमोरच्या समुद्रात आज सकाळी मच्छीमारांची बोट बुडाली. मात्र या बोटीवरील काही खलाशी पोहून किनाऱ्यावर आल्यामुळे आणि काही खलाशांना वचवल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंजनवेलच्या लाईट हाऊससमोर खोल समुद्रात सकाळी मच्छीमारांची बोट बुडली. या बोटीवर ८ खलाशी होते. त्यातील ६ खलाशी पोहत किनाऱ्यावर आले, तर इतर दोघे बुडणाऱ्या बोटीला धरून बसले होते. हा प्रकार जवळच्या दुसऱ्या बोटीवरील खलाशांनी पाहिला आणि त्यांनी त्या दोघांना वाचवले. त्यानंतर काहीवेळाने ही बोट बुडाली.