breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माजी मंत्री अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अहमदनगर – माजी मंत्री व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 3 मुली, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, नगर अमरधाम येथे आज सकाळी साडे दहा वाजता अनिल राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनिल राठोड हे ‘भैया’ नावाने सर्वत्र प्रसिद्ध होते. भैया हे सलग ५ वेळा नगर शहर मतदार संघाचे आमदार व काही काळ मंत्रीदेखील होते. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.