चिंताजनक! सायबर गुन्हे उघडकीस आणण्यात महाराष्ट्र आणि मुंबई सायबर सेलला अपयश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/download-4.jpeg)
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जानेवारी ते जून 2020 या काळात तब्बल 1057 सायबर गुन्हे घडलेले आहेत. तर आतापर्यंत एकूण1097 सायबर गुन्हे घडलेले आहे. मात्र, त्या पैकी केवळ 80 गुन्हे उघडकीस आणण्यास तपास यंत्रणांना यश आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून सहा महिन्यात 1005 गुन्हे सायबर गुन्हे घडले होते. त्यापैकी फक्त 110 गुन्हे तपास यंत्रणांनी उघडकीस आणले होते.
संगणकाच्या सोर्स कोड संदर्भात छेडछाड..
हा अतिशय गंभीर प्रकारचा ॲानलाईन फ्रॉड असून दरवर्षी किमान 2 ते 3 असे फ्रॉड होतात. बहुतांश अशा प्रकारचे फ्रॉड शोधून काढण्यात तपास यंत्रणांना अपयश येते. गेल्या 6 महिन्यांत मुंबईत असा एकच सायबर फ्रॉड दाखल झाला आहे.
संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ला…
अशा प्रकारचे सायबर हल्ले करुन संबंधित पीडितांकडून पैसे उकळले जातात. परदेशात अशा सायबर हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे. जे आता मुंबईत देखील वाढू लागले आहे. गेल्या 6 महिन्यांत मुंबईत असे 4 सायबर हल्ले झालेत. ज्यापैकी फक्त एकच हल्ला उघडकीस आणण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. यंदा लॉकडाऊनमुळे फक्त 4 च हल्ले झालेत नाही तर गेल्या वर्षी जानेवारी ते जून या 6 महिन्यांत अशा प्रकारचे 19 सायबर हल्ले झाले होते. त्यापैकी फक्त एकच उघडकीस आणण्यास महाराष्ट्र पोलिसांना यश आलं आहे.