Breaking-newsराष्ट्रिय
मिझोराममध्ये भूस्खलनात 10 जण ठार

मिझोराम : लुंगले नगर येथील लूनग्लान भागात जोरदार पावसामुळे इमारत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झालाय. रात्री भूस्खलनने दोन मजली इमारत कोसळली. या घटनेमध्ये तळ मजल्यावरील एका कुटुंबातील सात जण आणि पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेतील अन्य चार जणांना वाचविण्यात यश आले आहे. यातील एक जण जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, एकूण 14 जण इमारतीत रहात होते. लुंगलेई जिल्हा आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.





