breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 120 जणांची कोरोनावर मात
पिंपरी- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 120 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. कौतुकास्पद म्हणजे 90 जण कर्तव्यावर रुजू देखील झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील 2, 117 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यापैकी 149 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्यातील 120 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांनी दिली आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या 15, 632 वर पोहोचली असून, 10, 158 जण कोरोनामुक्त झाले आहेत.