Breaking-newsताज्या घडामोडी
नागपूरात जनता कर्फ्युला नागरिकांचा चांगला प्रतिसाद..
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/tukaram-mundhe.jpg)
नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागपूर शहरात आज व उद्या असे दोन दिवस जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले आहे. या जनता कर्फ्युला नागपूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील सर्वच मोठ्या बाजारपेठा स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.
नागपुरात आतापर्यंत कोरोनामुळे 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी आणि दुकानदारांनी नियम पाळले तर ठीक नाहीतर कडक लॉकडाऊन करावे लागणार, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.