Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
देहू संस्थानच्या भक्तनिवासातील कोविड केअर सेंटरची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

देहुरोड । प्रतिनिधी
कोविड रुग्णांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत. या हेतूने देहू संस्थान येथील भक्तनिवासामध्ये १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याची पाहणी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
यावेळी हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार गीता गायकवाड, डॉ. किशोर यादव आदी उपस्थित होते.





