Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाभीजी पापड’ खा आणि कोरोनामुक्त व्हा, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम यांचा दावा

Share On

जयपूर : केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होत आहे. या व्हिडीओत त्यांनी हातात पापडचं पॅकेट पकडलेलं आहे. ते पॅकेट ‘भाभीजी पापड’ कंपनीचं आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा त्यांनी केला आहे. ‘भाभीजी पापड’ खाल्याने शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढणारे अँटिबॉडी तयार होतात’, असा दावा अर्जुन राम मेघवाल यांनी केलेला आहे.

“एका व्यावसायिकाने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ‘भाभीजी पापड’ नावाने पापडची कंपनी सुरु केली आहे. हे पापड कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदत करतील. त्यामुळे ‘भाभीजी पापड’च्या व्यावसायिकाला माझ्याकडून खुप शुभेच्छा. ते नक्की यशस्वी होतील”, असं अर्जुन राम मेघवाल म्हणालेले आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. तर दुसरीकडे अनेकजण कोरोनावर उपचारबाबत वेगवेगळे दावा करत आहेत. कोणत्याही खाद्य पदार्थाने कोरोनावर मात करता येऊ शकत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पण कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनावर मात करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं देखील जरुरीचं आहे. त्यासाठी पौष्टिक अन्न खावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button