breaking-newsराष्ट्रिय
अनुराग ठाकूर भाजपचे लोकसभा प्रतोद
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद म्हणून हिमाचल प्रदेशातील पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी राकेश सिंह हे भाजपचे मुख्य प्रतोद होते. पण त्यांची मध्यप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांची ही जागा रिक्त होती. तसेच मध्यप्रदेशात सध्या निवडणूकीचे वातावरण असल्याने त्यांना संसदेतील पक्षाच्या कामाकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांच्या जागी ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर हे पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.