Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: चिंताजनक! ‘या’ देशात रस्त्यावर पडलाय मृतांचा खच, सडलेल्या अवस्थेत मिळाले तब्बल 400 मृतदेह

सुक्रे: जगातील बहुतेक देश कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. जगभरात एक कोटी 48 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एकट्या अमेरिकेत 39 लाखहून अधिक रुग्ण आढळलेले आहेत. मात्र दक्षिण अमेरिकेतील (South America) देशांची परिस्थिती सर्वात वाईट आहे. बोलिव्हिया (Bolivia) या देशातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 दिवसात शहरातील प्रमुख रस्ते आणि घरातून तब्बल 400 मृतदेह सापडलेले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहांची अवस्था पाहता यातील 85% पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. वृत्तसंस्खा AFP च्या माहितीनुसार, बोलिव्हियातील कोचाबांबा या शहरातून तब्बल 191 शव बाहेर काढले आहेत. याशिवाय पाज शहरातून 141 मृतदेह, हे सर्व मृतदेह घरात सडत पडले होते. राष्ट्रीय पोलीस संचालक कर्नल इव्हान रोजस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यापूर्वी अशी भयंकर परिस्थिती कधीच पाहिलेली नव्हती. देशातील सर्वात मोठे शहर सांता क्रूझच्या रस्त्यांवरूनही 68 मृतदेह सापडले आहेत. केवळ या शहरातच देशात 50% कोरोना पॉझिटिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत या एका शहरात 60 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group