धक्कादायक! भाचीची छेड काढल्याचा विरोध केल्यानं पत्रकारवर गोळीबार करून खुन (VIDEO)
गाझियाबाद: पत्रकार विक्रम जोशी यांचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. मुलींसोबत जात असताना काही अज्ञातांनी त्यांना घेरलं आणि बेदम मारहाण केली. मुलींच्या डोळ्यादेखतच त्यांच्यावर गोळीबार केला आहे. यामध्ये पत्रकार विक्रम जोशी गंभीर जखमी झाले होते.
गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. या प्रकरणी पोलिसांनी सध्या नऊ जणांना अटक केल्याची माहिती मिळालेली आहे. तर पोलीस चौकी इंचार्जला निलंबित करण्यात आलं आहे. पत्रकाराच्या भाचीसोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी तक्रार केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचा आरोप केलेला जात आहे. विक्रम यांच्या भाचीने 16 जुलै रोजी काही तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात छेड काढत असल्याची तक्रार दाखल केलेली होती. पोलिसात तक्रार दाखल केल्याच्या रागातून या अज्ञात तरुणांनी बदल्याच्या भावनेतून पत्रकार विक्रम यांना मारहाण करून गोळीबार केला आहे.
काही अज्ञात तरुणांनी मुलींच्या डोळ्यादेखत पत्रकार विक्रम जोशींवर हल्ला करत गोळीबार केला त्याची CCTV दृश्यं pic.twitter.com/g45iBY207Y
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) July 22, 2020