Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

सांगली : सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात 22 जुलैपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.

सांगलीत बुधवार 22 जुलै रात्री 10 वाजल्यापासून गुरुवार 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असेल. सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला. सांगलीतील गर्दी कमी न झाल्यास लॉकडाऊन करणार, असा इशारा आधीच जयंत पाटील यांनी दिला होता.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजीत कदम, विद्यमान आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या आठवड्यात सांगली महापालिका क्षेत्रात 195, तर उर्वरित ग्रामीण भागात 123 कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजाराच्या वर गेल्याने धास्ती वाढली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button