breaking-newsपुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विद्यापीठातील सेवक चाळीतील दोघांना, तर एका अधिकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला . त्यामुळे विद्यापीठातील 4 इमारती 7 दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या शिरकावानंतर विद्यापीठात अत्यावश्यक कामांशिवाय कुणीही येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कर्मचारी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन कामांवर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.
पुणे विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच विद्यापीठाबाहेरील व्यक्तींना अत्यावश्यक कामाशिवाय परिसरात येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.