Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रमुंबई

गेल्या 24 तासात तब्बल 133 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, तर 2 पोलिसांचे निधन

मुंबई – लॉकडाऊनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून पोलिस दिवस-रात्र आपलं कर्तव्य बजावत आहे. रस्त्यावर ड्युटी करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा अनेकांशी संपर्क येत आहे. परिणामी कोरोनाबाधित पोलिसांची संख्याही वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 133 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात 19 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात 184 कोरोनाबाधित पोलिस अधिकारी आणि 1305 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 87 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात 7 पोलिस अधिकारी तर 80 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना संकटाच्या काळात पोलिस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलिस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button