Breaking-newsमुंबई
येत्या २४ तासांत मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/rain.jpg)
मुंबई : येत्या २४ तासांत मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी पश्चिम किनारपट्टीवर पाऊस असण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. याआधी आठवड्याभरापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली आहे.
बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे.