breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | देशात गेल्या २४ तासात २८,७०१ नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक होत चालली आहे. गेल्या २४ तासात देशात २८,७०१ नवे रुग्ण आढळले असून ५०० जणांच मृत्यू झाला आहे. सध्या भारतातील रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
५ लाख ५३ हजार ४७१ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत २३ हजार १७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.