सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीची वादग्रस्त टिपण अखेर रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/pic.jpg)
सिंधुदुर्ग | परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी यायचे असेल तर ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पोहचून होम क्वारंटाईन व्हाव लागू शकत असा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.तसेच त्यानंतर कोणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. गृह विलगीकरणाचे नियम मोडल्यास वा ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश कल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशा प्रकारचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या बैठकीतील इतिवृत्त समोर आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
हा अंतिम आदेश नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतरही चाकरमान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. त्या वादावर आज पडदा टाकण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील संबंधित वादग्रस्त टिपण आज रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम अॅपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली.
यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, यांच्यासोबत अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. चाकरमान्यांना गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येण्यास डेडलाइन ठरवणाऱ्या व प्रवेशबंदीचे संकेत देणाऱ्या टिपणवर चर्चा झाली. त्यानंतर सदर वादग्रस्त टिपण रदद् करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.