breaking-newsमुंबई
भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
भिवंडी : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, सून, पुतण्या यांसह एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षण असल्याने घरातच क्वारंटाईन करण्यात आली आहे.