Breaking-newsपुणे
राज्यातील सर्वाधिक चाचण्या पुण्यात

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला आहे. शहरात दर दहा लाख लोकांमध्ये 30 हजार तपासण्या होत आहेत.
राज्यात आणि देशात होणाऱ्या चाचण्यांच्या प्रमाणात पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. राज्यात पुण्याखालोखाल कोरोना चाचणी करण्याच्या प्रमाणात मुंबईचा क्रमांक आहे.
पुणे शहरातील कोरोना बधितांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 2 लाख 33 हजार 254 नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे. यामध्ये 73 हजार 383 नागरिक ‘हाय रिस्क’ गटातील आहेत. तर, 1 लाख 59 हजार 871 नागरिक ‘लो रिस्क’ गटातील आहेत.





