रेल्वेतील नव्वद हजार नोकऱ्यांसाठी सुमारे अडीच कोटी अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/railway-jobs-appli..jpg)
नवी दिल्ली – रेल्वेतील गट क, पातळी-1 आणि ग्रुप ड, पातळी 2 च्या सुमारे 90 हजार जागांसाठी अडीच कोटीपेक्षाही अधिक अर्ज आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. इतक्या प्रचंड संख्येने आलेले अर्ज पाहून रेल्वे मेगा भरती बोर्डापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे.
इतक्या प्रचंड संख्येने आलेल्या अर्जांमधून-ज्यात बी.एससी; एम. एससी; बी.टेक…… इतकेच नाही, तर एम. टेक. अणि पी. एचडी; झालेल्या उमेदवारांनी केलेल्या उमेदवारांची निवड् कशी करायाची हा एक यक्ष प्रश्नच बनलेला आहे. यांच्या परीक्षांचे आयोजन कोठे आणि कसे करायचे या प्रश्नाचे रेल्वे भरती अधिकाऱ्यांची झोप उडालेली असून भरती प्रक्रियेसाठी त्यांनी वाढीव मुदत मागितली आहे.
एसएससी आणि आयटीआय पात्रतेचे उमेदवार अपेक्षित असताना बी.एससी; एम. एससी; बी.टेक…… इतकेच नाही, तर एम. टेक. अणि पी. एचडी; झालेल्या उमेदवारांनी अर्ज रेल्वे बोर्डाला मिळालेले आहेत. त्यांचे मूल्यांकन करण्याचा क्ल्पनेनेच रेल्वे बोर्डाला घाम फुटण्याची वेळ आलेली आहे.
ग्रुप सी लेव्हल – 2 मध्ये असि. लोको पायलट, फिटर, क्रेन ऑपरेटर आदींचा समावेश आहे. या गटातील रिक्त जागांसांठी 3 फेब्रुवारीला अर्ज मागवण्यात आले होते. दुसऱ्या गटात ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समेन, हेल्पर्स, पोर्टर्स आदींचा समावेश आहे.