मुंबई आणि कोकण किणारपट्टीवर पुढील 24 ते 48 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांत मुंबई आणि कोकण विभागात पावसाने चांगला जोर धरला . रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तर अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. दक्षिण कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहण्याची आहे.
तर पुढील २४ ते ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हा पाऊस प्रामुख्याने कोकण भागात पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत आज दुपारी समुद्राला उधाण येणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. तसेच समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह चांगला पाऊस झाला. दरम्यान, पुढील २४ ते ४८ तासात पुन्हा कोकण किणारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.