‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका एका नव्या वळणावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/download-11.jpg)
मुंबई : ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. एकमेकांवर अपार जीव असणारे राणा आणि अंजली आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. अंजलीसमोर राणा वाईट ठरल्यामुळे अंजली राणाच्या विरोधात जायचं ठऱवते. राणाला पकडून द्यायला मोहितेची मदत करायचं ती ठरवते. सोबतच राणा लोकांना न्याय मिळवून देत असतानाच स्वतला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे राणा अंजलीच नातं टिकणार की नाही ? हे आगामी एपिसोडमध्ये कळेल.
तुझ्यात जीव रंगला मालिका पुन्हा एकदा नव्या फ्रेश एपिसोडसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ जुलै पासून संध्याकाळी ७.३० वा. झी मराठीवर नवे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे मालिकांचं शुटींग बंद होतं. पण आता शुटींगला सुरुवात झाली आहे. झी मराठीवर आता नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.