Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राजगृहावर झालेल्या तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केले शांततेचे आवाहन
मुंबई | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल (७ जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या आणि घरातील कुंड्यांची नासधूस केली. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचंही नुकसान झाले आहे. माटुंगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.