Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

सलग २१व्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले

मुंबई | सलग ८२ दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. या नंतर सात जूनपासून सलग एकविसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर पेट्रोल आणि डिझेलवर कर लागू आहेत. प्रत्येक राज्यात इंधनावर व्हॅट लागू होतो. या करांमुळे इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

मुंबईत आज (शनिवारी) पेट्रोल प्रति लिटर ८७ रुपये १४ पैसे तर डिझेल प्रति लिटर ७८ रुपये ७१ पैसे या दराने उपलब्ध आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल ८६ रुपये ९१ पैसे आणि डिझेल ७८ रुपये ५१ पैसे या दराने उपलब्ध होते. पेट्रोलच्या दरात २३ पैशांची आणि डिझेलच्या दरात २० पैशांची वाढ झाली. लॉकडाऊनमुळे सरकारी महसुलात घट झाली आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी सर्व राज्यांनी दारू आणि इंधनावरील करांच्या माध्यमातून महसुली घट कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या करामुळे इंधनाचे दर वाढले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group