breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: गेल्या 24 तासांमध्ये 18256 नवीन रुग्ण वाढले, आतापर्यंत 5.09 लाख केसेस
नवी दिल्ली: देशात कोरोना संक्रमितांची संख्या 5 लाख 9 हजार 446 झाली आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी 18 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. तर 10 हजार 246 रुग्ण बरेही झाले आहेत. तर महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या दिड लाखांच्या पार गेली आहे. येथे एका दिवसात सर्वात जास्त 5024 संक्रमित आढळले आहेत.
तर अनलॉक-1 म्हणजेच जून महिन्याच्या 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. एक जूनला 1 लाख 98 हजार 371 रुग्ण होते. म्हणजे 26 दिवसांमध्ये 3 लाख 11 हजार 095 रुग्ण वाढले आहे. तर संक्रमितांचा आकडा पाच लाखांपेक्षा अधिक झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेटही झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान रिकव्हरी रेटमध्ये 16 % वाढ झालेली आहे. आता रिकव्हरी रेट 58.26% वर गेलेला आहे.