Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे : दिवसभरात नवे ५०१ कोरोनाबाधित; एकूण संख्या १३ हजार ६५४ वर!
![# Covid-19: The lowest number of patients in the country in 74 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/COVID-19-500x320-1.png)
पुणे : पुणे शहरात आज नव्याने ५०१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात खासगी २५०, नायडू-महापालिका रुग्णालये २३६ आणि ससूनमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या ५०१ रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या आता १३ हजार ६५४ इतकी झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.