breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आजपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गेट उघडणार

अमरावती | कोरोना संकटात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पर्यटकाअंतर्गत येणारे सर्व पर्यटन गेटवर 19 जून अर्थात आजपासून फक्त जंगल सफारी आणि इतर सुविधा सुरू करण्याचे आदेश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी आज जारी केले आहेत. याठिकाणी पर्यटकांना थांबण्याची सुविधेची मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही. उद्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य, काटेपुर्णा वन्यजीव अभयारण्य, लोणार वन्यजीव अभयारण्य आणि टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य निसर्ग पर्यटन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मागील तीन महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प बंद असल्याने स्थनिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून पर्यटकांसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मागणी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे करण्यात आली होती, वनमंत्री यांनी 1 जुलैपासून राज्यातील सर्वच प्रकल्प सुरू करण्यात येईल असं ते बोलले पण उद्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अखेर उद्यापासून सुरू होणार असल्याचे आज आदेश काढण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button