Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांतसिंह राजपूत अखेर अनंतात विलीन…

Share On

अभिनेता सुशांतसिंह राजपूत अखेर अनंतात विलीन झाला. सुशांतच्या पार्थिवावर विले पार्लेतील पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी पावणेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे वडील, बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आली…

कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात वरुणराजानेही हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अभिनेते विवेक ओबेरॉय, रणवीर शौरी यासारखे मोजके कलाकार वगळता मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली नाही.

सुशांत सिंह राजपूतचं पार्थिव दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कूपर रुग्णालयातून पवन हंस स्मशानभूमीत नेण्यात आलं. यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

सुशांत सिंह राजपूतचे पार्थिव पुन्हा एकदा पाटण्याला नेण्याबाबत कुटुंबाने मागितलेली परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे सुशांतचे वडील आपल्या मुलाला अखेरचा निरोप देण्यासाठी बिहारहून आज दुपारी मुंबईत दाखल झाले. सुशांतचे कुटुंबिय आधी त्याच्या वांद्र्यातील निवासस्थानी गेले होते, तिथून ते पवन हंस स्मशानभूमीत गेले. सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने कूपर रुग्णालयात जाऊन त्याचे अखेरचे दर्शन घेतलं.सुशांतच्या घरी फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. वांद्रे पोलीसही घटनास्थळी गेले. त्यांनी घरातील बारीक-सारीक वस्तूची बारकाईने तपासणी केली. मात्र सध्या तरी तपासात त्यांच्या हाती काही ठोस पुरावे नाही मिळालेत…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button