breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ४५ नवे रुग्ण
रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर आतापर्यंत ४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा १६५२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ८२ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ३०, पनवेल ग्रामिणमधील ४, उरण मधील ७, कर्जत १, पेण २, रोहा मधील १ रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील १, पनवेल ग्रामिणमधील २ तर कर्जत येथील एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील ५११६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ३३८३ जणांचे अहवाल नकारात्मक आले. १६५२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.