breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 रुग्णांची वाढ, 468 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून रुग्णसंख्या 1569 वर पोहोचली आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे जुना बाजार (2), चिस्तीया कॉलनी (2), उस्मानपुरा (1), एन आठ सिडको (2), भवानी नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (2), आझम कॉलनी (4), एन सहा सिडको (1), युनूस कॉलनी (1),मुकुंदवाडी (1), मिसरवाडी परिसर (1), नारेगाव (1), रेहमनिया कॉलनी (1), वैजापूर (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 13 महिला आणि 13 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी 45 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. तर आणखी तीन रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्याही 42 वर गेली. यापैकी एकट्या घाटी रुग्णालयात 61 जणांचा मृत्यू झाला आहे.