Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात रविवारी रात्री आढळले ५ नवे कोरोनाबाधित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-3.png)
सोलापुरात रविवारी रात्रीत करोनाबाधित ५ नवे रूग्ण सापडले. १७५ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात तीन पुरूष व दोन महिलांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. इतर सर्व १७० अहवाल निगेटिव्ह आले. एकूण रूग्णसंख्या ३९० इतकी झाली आहे. त्यात २६ मृतांचा समावेश आहे. आतापर्यंत १५८ रूग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या रूग्णालयांमध्ये २०६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.