Breaking-newsराष्ट्रिय
कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज-निर्मला सीतारामन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200516_164643.jpg)
देशातील कोळसा उत्पादन वाढीवर भर दिला जाणार असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कोळश्याच्या व्यावसायिक उत्पादनावर भर दिला जाणार असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कोळशाद्वारे गॅसनिर्मितीला प्राधान्य दिलं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोळसा क्षेत्रातील सरकारचे एकाधिकार कमी केले जाणार असंही त्यांनी सांगितलं. कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना संधी दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.