Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! आंध्र प्रदेशमध्ये ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळून १३ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/AP-Accidnet.jpeg)
शेतातली काम आटोपून संध्याकाळी घराकडे निघालेल्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळून १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम भागात हा अपघात घडला आहे. मृत १३ व्यक्तींमध्ये ११ महिला शेतमजुरांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरचा चालक व मदतनीसही मृत्यूमुखी पडला आहे.