Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: धक्कादायक!सोलापूरमध्ये एचडीएफसी बँकेच्या 13 कर्मचाऱ्यांना अटक
टाळेबंदी काळात ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ बँकेचे कामकाज सुरू ठेवल्याबद्दल सोलापुरातील एचडीएफसी बँकेच्या मेसॉनिक चौक शाखेच्या १३ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. टाळेबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी पोलिसांनी या१३ कर्मचाऱ्यांना अटक करून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले.
टाळेबंदी काळात शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नागरिकांना सुविधा देताना बँकांच्या कामकाजाच्या वेळेत सुधारणा करून सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत बँकेची सेवा सुरू राहण्याबाबत आदेश जारी केले होते. परंतु एचडीएफसी बँकेच्या मेसॉनिक चौकातील शाखेचे कामकाज पोलीस आयुक्तांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळेपर्यंत म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरूच असल्याचे आढळून आले. त्याची पोलिसांनी दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात आली.