Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

तलवारीने वार करून केली जावयाची हत्या

Share On

रीरामपूर | घरगुती हिंसाचार, मारहाण अशी प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुठेवाडगाव इथं सासऱ्याने जावयाची हत्या केली आहे. भांडण झाल्यानंतर सासऱ्याने मित्रांच्या मदतीने जावयावर तलवार आणि इतर धारदार शस्र्यांनी वार करत त्याची हत्या केली. मयूर आकाश काळे (वय 28) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

दागिन्यांवर झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने मयूर काळे याचा खून केला, अशी माहिती आहे. मुठेवाडगाव इथं शेती महामंडळाची पडीक जमीन आहे. या जमिनीत अतिक्रमण करुन बाहेरगावाहून आलेली चार कुटुंबे राहतात. आरोपी सचिन काळे हा येथेच राहून मोलमजुरी करतो. त्याचा जावई मयूर काळे हा मूळचा कर्जतचा असून तोदेखील सासूरवाडीलाच राहात होता. 5 वर्षांपासून त्याचे गावातच वास्तव्य होती. काल आरोपी सचिन काळे याने जावई मयूर व त्याची पत्नी मोनिका या दोघांकडे दागिण्यांची मागणी केली. त्यातून भांडण झाले. हा वाद विकोपाला गेला. अखेर मित्राच्या मदतीने सासऱ्याने जावई मयूर काळे याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली.दरम्यान, याप्रकरणी मृत मयूर काळे याची पत्नी मोनिका काळे हिने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात सासरा सचिन काळे (रा. मुठेवाडगाव, ता.श्रीरामपूर), संदिप काळे, (रा.भेंडाळा, ता.गंगापूर) व बुंदी काळे (रा. मिरजगाव, ता.कर्जत) व एक अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना पकडले असून संदीप काळे हा फरार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button