दुःखद! हंदवाडानंतर ४८ तासात दुसरा दहशतवादी हल्ला; ३ जवानांना वीरमरण
जम्मू काश्मीरच्या हंदवाडा जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी संरक्षण दलावर हल्ला केला. हंदवाडामधील काझियाबाद परिसरत सीआरपीएफच्या एका गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ३ जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले आहे. चकमकीदरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे.
दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी काझियाबादमध्ये गस्तीसाठी जात असलेल्या सीआरपीएफच्या एका पथकावर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. मात्र या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सात जवान जखमी झाले असल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
3 CRPF personnel have lost their lives, 7 injured in terrorist attack in Handwara(J&K), CRPF officials tell ANI https://t.co/tG0NbdOgTG
— ANI (@ANI) May 4, 2020