Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
संकटाचा काळ लोकांना नवीन शोधासाठी तयार करेल – सुंदर पिचई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/sundar_pichai.jpg)
जगभरातील कोविड-१९ महामारीने तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका रेखांकित केली आहे. यावेळी सरकार आणि नागरिकांनी गुगलकडेे मदद मागितली. एका मासिकानेे गुगल, यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेटचे भारतीय मूलनिवासी सीईओ सुंदर पिचई यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या. पिचई महामारींविषयी भविष्यातील स्थितीसाठी आशावादी आहेत. ते मानतात प्रत्येक संकट लोकांमध्ये क्रियाशीलता वाढवते. स्थितीशी सामना करण्यासाठी नवीन पद्धतींचा शोध घेतला जातो, त्यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी असे विधान केले आहे.